आता सुरू होणार सर्व पंचायती मध्ये सहकारी डेअरी सुरू, अमित शहा यांची घोषणा

सध्या दूध व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मध्ये आनंदाचे वातावरण आहे. दूध व्यवसाय अधिक मजबूत आणि विकसित होण्यासाठी सरकार नेहमीच अग्रेसर असते आणि शेतकऱ्यांना हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक उपाय योजना आणि सवलती देत असते. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा हा जास्त प्रमाणात होतो. आता केंद्र सरकार असाच एक निर्णय घेणार आहे तो देशातील प्रत्येक पंचायती मध्ये दूध डेअरी सुरू करणार आहे. यावर बोलताना केंद्रिय सहकार मंत्री अमित शहा म्हणाले की शेतकऱ्यांचे जीवन दूध व्यवसाया वर अवलंबून असते त्यामुळे या व्यवसायाला जर चालना मिळाली तर त्याची गरिबी दूर होईल आणि अनेकांचे राहणीमान सुधारेल.


You have to wait 90 seconds.

Download Now


या सर्व कारणांमुळे येणाऱ्या 5 वर्षा मध्ये देशातील सर्व पंचायती मध्ये दूध डेअरी उभारण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. तसेच जे दूध व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक आहे त्यांना नाबार्ड 25 टक्के सबसिडी देत आहे. या संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही पशूपालक स्टार्टअप इंडिया आणि नाबार्डच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

Leave a Comment