राज्यात सध्या सर्वत्र परतीचा पाऊस पडत आहे त्यामुळे सगळीकडे पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हा पाऊस कधी परत जाईल याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागून आहे. हा पाऊस 15 ऑक्टोबर क परत जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पाऊस परत गेल्यावर वातावरण जरी ढगाळ स्वरुपाचे असले तरी राज्यात शेतीच्या कामाला सुरवात करता येईल असे हवामान खात्याने सांगितले आहे. तसेच राज्यात परत 20 ते 24 ऑक्टोबर दरम्यान किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
असे असले तरी उद्या पासून हा पाऊस मागे जाण्याच्या प्रक्रियेला सुरवात करणार आहे. या सतत पडत असलेल्या पावसामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे तर अनेक भागामध्ये शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा पाऊस मुंबई मध्ये देखील पडला आहे आणि तसेच बीड, कोल्हापूर, धुळे, पालघर, लातूर, सोलापूर, सांगली, अहमदनगर, पुणे या जिल्ह्याना देखील पावसाने झोडपले आहे. यामुळे कापूस, सोयाबीन आणि भाजीपाला याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.