गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ऊस दरावरून आक्रमक झाले आहेत. यासाठी ते राज्यभर दौरे करत आहेत. ऊस उत्पादक अडचणीत आला असून त्याला न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे. आता वर्षीच्या एफआरपीपेक्षा २०० रुपये प्रतिटनी जास्त ऊसदर व यावर्षीची एकरकमी एफआरपी मिळण्यासाठी ते मोर्चे काढत आहेत.यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १७ व १८ नोव्हेंबर रोजी राज्यातील कारखाने बंद ठेवण्याचे जाहीर केले होते. आता सातारा जिल्ह्यात ऊस दर जाहीर होत नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन पेटलं आहे. इंदोली- कराड गावाजवळ उसाने भरलेल्या ट्रॅक्टर अज्ञात आंदोलकांनी मध्यरात्री पेटवला. यामुळे वातावरण तापले आहे.जयवंत शुगरचा कारखान्याला ऊस पोहचविणाऱ्या ट्रक्टरला आग लावण्यात आली आहे. यामुळे हा प्रश्न कधी निकाली लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने हे शेजारील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांपेक्षा कमी दर देत आहेत, असा आरोप केला जात आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

राज्यातील साखर कारखान्याकडून होत असलेल्या काटामारीबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ७ नोव्हेंबर रोजी धडक मोर्चा काढला होता. यावेळी या मोर्चाची दखल घेवून राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी खाजगी वजन काटे वैद्यामापन शास्त्र विभागाकडून प्रमाणित केले असल्याने खाजगी वजन काट्यावरून वजन करून आणलेल्या ऊसाचे वजन ग्राह्य धरण्याचे परिपत्रक काढले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे. तसेच विनापावती साखरेची विक्री करून सरकारच्या सुमारे २५० कोटी रुपयांच्या जीएसटीलाही चुना लावतात. याबाबत शासनाने साखर कारखान्यांच्या गोदामावर अचानक छापे टाकावेत आणि बेहिशेबी साखर किती आहे तपासावे, अशी मागणी देखील त्यांनी केली.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *