किसान सन्मान निधीचे २ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, पंतप्रधान मोदींची शेतकऱ्यांना दिवाळी भेट पहा सविस्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत पीएम किसान सन्मान संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी 16 हजार कोटी रुपयांचा 12 वा हप्ताही जारी करण्यात आला. दिवाळीपूर्वी पीएम मोदींनी शेतकऱ्यांना ही भेट दिली आहे. यामुळे पीएम मोदींनी हप्ता जारी करताच देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा झाले आहेत. 16 हजार कोटी एकाच वेळी जमा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11.30 वाजता पीएम किसान सन्मान संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 14000 शेतकरी आणि सुमारे 1500 कृषी स्टार्टअप सहभागी झाले होते. यादरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे.


You have to wait 90 seconds.

Download Now


देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास 16000 कोटी रुपये क्षणार्धात पोहोचणार आहेत. गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा उद्देश आहे. केंद्र सरकारने दिलेल्या नमुन्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न, मालमत्ता इत्यादी तपशील भरले जातात. शेतकऱ्याचे बँक खाते व इतर माहिती कृषी विभागात दिली जाते.पडताळणी पूर्ण झाल्यावर शेतकऱ्याच्या खात्यावर वर्षातून तीनदा (४ महिन्यांतून एकदा) २ हजार रुपये येतात. दरम्यान, यामध्ये अनेक शेतकरी बोगस आढळून आले आहेत. यामुळे त्यांची नावे कमी करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून आता पैसे देखील वसूल केले जाणार आहेत. दरम्यान, देशभरातील शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या 12व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात हप्ता आला होता. यावेळी ऑक्टोबर महिना आहे. मात्र हप्ता आलेला नव्हता. आज पंतप्रधान किसान सन्मान संमेलनाचा शुभारंभ केला. यामध्ये अनेक शेतकरी तसेच केंद्रीय मंत्री देखील उपस्थित होते. पीएम किसान सन्मान निधी योजनेतील अपात्रांना बाहेर करण्यासाठी केंद्र सरकार पावले उचलत आहे. शेतकऱ्यांची पडताळणी वेगाने केली जात आहे. एकट्या उत्तर प्रदेशमध्ये पीएम किसान निधी योजनेचा लाभ घेणारे सुमारे 21 लाख लाभार्थी अपात्र आढळले आहेत.

Leave a Comment