देवगडचा हापूस APMC मध्ये दाखल; हापूसला मिळाला नऊ हजारांचा विक्रमी दरआंबा प्रेमींसाठी खुशखबर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील हापूस आंब्याची पहिली पेटी नवी मुंबईतील वाशी मार्केटला आली आहे. देवगड हापूसच्या यावर्षीची पहिली पेटी पाठवण्याचा कातवण गावातील दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे यांना मिळाला आहे.

देवडमधील कातवण गावातील दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे या दोन युवा आंबा बागायतदारांनी आपल्या बागेतील हापूस आंबे मुंबईतील वाशी मार्केटला पाठवले आहेत. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारचा मुहूर्त साधून दोन डझन आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला पाठवली आहे.

हापूसला नऊ हजारांचा विक्रमी दर

दोन डझनाची पहिली पेटी एपीएमसी बाजारातील व्यापारी अशोक हांडे यांच्याकडे शुक्रवारी (ता. २५) दाखल झाली. या आंब्याची विधिवत पूजा करून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली असून या हापूसला नऊ हजार रुपये दर मिळाला आहे.

आंबा प्रेमींसाठी खुशखबर आहे. आफ्रिकन देश मलावीमधून हापूस आंबा महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मुंबईतील एपीएमसी बाजार समितीत मलावी देशातून या हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या मलावीच्या आंब्याला मोठी मागणी आहे.

मलावीतील हापूस आंब्यालाही भारतात मोठी मागणी आहे. दरवर्षी हा आंबा देशाच्या बाजारपेठेत दाखल होतो. यंदाही मुंबईच्या एपीएमसी बाजार समितीत मालवी येथील हापूस आंबा दाखल झाला आहे. या मालवी आंब्याला महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठी मागणी आहे.

Leave a Comment