नंदूरबार बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

 

नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत सफेद मक्याला विक्रमी दर मिळाला आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहेत. पतवारीनुसार मक्याला 2 हजार 462 ते 2 हजार 899 पर्यंत दर मिळत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत आहे. यावर्षी नंदूरबार बाजार समितीत लाल आणि सफेद मक्याला विक्रमी दर मिळत असून शेतकरी समाधानी आहे. दररोज अडीच ते तीन हजार क्विंटल मक्याची आवक बाजार समितीत होत आहे. मक्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता बाजार समितीच्या वतीनं व्यक्त केली जात आहे. असे असले तरी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. त्यामुळं शेतकरी संकटात आहेत. अशातच काही शेतकऱ्यांची पिकं या पावसाच्या फटक्यातून वाचली आहेत. त्यांच्या पिकांना चांगला दर मिळत असल्यानं थोडाफार तरी दिलासा शेतकऱ्यांना मिळत आहे.

पावसातून वाचलेल्या धान्याला चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. बाजारपेठेत मक्याची आवक वाढण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत. मक्याची आवक वाढली तर काही अंशी दर कमी जास्त होण्याची शक्यता देखील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्या नंदूरबार बाजार समितीत मक्याची आवक वाढली असून, दररोज 3 हजार क्विंटलपेक्षा अधिक मका विक्रीसाठी दाखल होत आहे. नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मका, सोयाबीन, ज्वारी, लाल मिरची तेजीत आहे. या पिकांना चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

Leave a Comment