बीड जिल्ह्यातल्या आर्वी गावच्या सुरेश काळे यांनी तीन लाख रुपये खर्च करून साडेतीन एकरावर पपईची लागवड केली. मात्र ऐन तोडणीच्या काळातच ही बाग आता तोडून टाकावी लागत आहे. यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याचे कारण म्हणजे पपईवरती व्हायरसने इतका अटॅक केलाय की बागाच्या बागा उद्ध्वस्त होऊ लागल्या आहेत.

बीड जिल्ह्यातल्या अनेक गावातील पापईच्या बागावरती या व्हायरसचा अटॅक झाला आणि त्यामुळे काढणीला आलेले पीक हातचे जाताना शेतकऱ्यांना पहावं लागत आहे. यामुळे यावरची लवकरच लक्ष देण्याची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांना एक रुपया देखील मिळत नाही. सध्या ज्या बागा तोडणीला आल्या आहेत, त्या भागांवर या व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

दरम्यान, अनेक शेतकऱ्यांनी यावर उपाययोजना केल्या मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. यामुळे आता पुन्हा पपईच्या बागांवर रोग पडल्याने शेतकरी सरकारकडून मदतीची अपेक्षा करत आहेत. या व्हायरसमुळे पपईच्या फळावर सुरुवातीला डाग पडतात आणि नंतर फळ सडून जातं. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नाही.

त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभ्या केलेल्या या बागा स्वतः नष्ट कराव्या लागत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट आणि पैसे वाया जात आहेत. शिरूर तालुक्यामध्ये सध्या या बुरशीजन्य व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रामेश्वर भोसले यांच्या तीन एकरावरील पपईच्या बागेत आता फळ गळायला सुरुवात झाली आहे.

अशा प्रकारे अनेक शेतकरी आहेत, ज्यांच्या शेतात अशाप्रकारे हा रोग आला असून यामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. दरम्यान, फळबागातून जास्तीचे उत्पन्न मिळते म्हणून अनेक शेतकऱ्यांनी पपईच्या बागा लावल्या. मात्र परतीच्या पावसानं पपईवर अनेक रोग आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी लाखो रुपये गुंतवले असताना उत्पन्न काहीच मिळाले नाही.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *