पांढरे सोने शेतकऱ्यांना श्रीमंत करणार; कापसाच्या दरात मोठी वाढ

 


आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता कापसाचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक कमी होत आहे. परंतु, काही शेतकरी अजूनही कापूस विकण्यास इच्छुक नाहीत, कारण शेतकरी कापसाला 10000 ते 11000 रुपये प्रतिक्विंटल दराच्या प्रतीक्षेत होते. आता हा दर मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत कापसाला सद्यस्थितीत सरासरी 9 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. यामुळे आता कापसाची आवक वाढली असून दररोज सुमारे प्रत्येक समितीत 100 वाहनांमधून एक हजार क्विंटल कापूस विक्रीसाठी येत आहे.

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत पळाशी येथील स्व. राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात कापूस खरेदीला महिनाभरापूर्वी सुरूवात करण्यात आली . त्यावेळी लिलावात मुहूर्ताच्या कापसाला 8 हजार 357 रुपये भाव मिळाला होता.

आत्तापर्यंत सुमारे 12 ते 13 हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. असे असले तरी कापसाचे दर आणखी वाढतील हि आशा शेतकऱ्यांना कायम आहे. यामुळे अजूनही शेतकऱ्यांनी घरात साठविलेला कापूस विक्रीसाठी आणला जात नसल्याचे दिसून येत आहे.

ऑक्टोबर महिन्यात तर नोव्हेंबरच्या 8 दिवसांत राज्यात नवीन कापसासाठी 6 हजार ते 7 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनीही कापूस साठविण्याचा विचार केला होता.

Leave a Comment