अतिवृष्टीतून शेतकरी सावरत असतानाच, देशात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकीकडे थंडीचा कडाडा वाढत असतानाच पुढील 48 तासांत देशात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.यामुळे शेतकऱ्यांची पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. ऐन हिवाळ्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने, बळीराजाची चिंता वाढली आहे. श्रीलंकेच्या किनारपट्टीवरील दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावर 9 नोव्हेंबरला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते.कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील 48 तासांत तमिळनाडू-पुद्दुचेरी-कराईकल येथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर 10 व 11 नोव्हेंबरला जोरदार वारे वाहण्याची अंदाज आहे.
महाराष्ट्रात दिवाळीनंतर आतापर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाश पडत होता. मात्र, आज सकाळपासून सूर्यप्रकाश गायब झाला आहे. वातावरण ढगाळ झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही पुढील दोन दिवसांत पावसाची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, आताच्या परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानातून शेतकरी अजूनही सावरला नाही. मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.