सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे पीकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्याचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसला आहे. या सर्व परिस्थितीत भाजी बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.
भाजीपाला महागला बाजारात शेवगा 200 रुपये किलो मिळत आहे. तसेच शहरातील किरकोळ भाजी बाजारात वांगी, टोमॅटो, भेंडी, फ्लॉवरसह सर्वच फळभाज्यांची सरासरी 60 रुपये किलो दर पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे.
भाजीपाला दर:- अ.क्र. भाजीपाला दर (प्रतिकिलो) शेवगा 200 गवार 80 टोमॅटो 60 वांगी 60 फ्लॉवर 60 कांदा 50 बटाटे 30 परतीच्या पावसाचा फटका पालेभाज्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्याचबरोबर सोयाबीन, कापूस, फळबागांसहित पालेभाज्या पिकांनाही फटका बसला आहे. या नुकसानीमुळे बाजार समित्यामध्ये होणारी पालेभाज्यांची आवक सरासरीने कमी झाली आहे. त्यामुळे सध्या भाज्यांच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. दिवाळीमुळे भाज्यांची मागणी वाढली आहे. पण पुरवठा होत नसल्यामुळे भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एका महिन्यानंतर पालेभाज्यांची आवक वाढणार असून त्यानंतर भाव कमी होतील अशी अपेक्षा बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.