गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणवर नुकसान झाले आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पावसामुळं शेतकऱ्यांच्या हाती आलेली पीक वाया गेली आहे. जी उरली सुरली पीक आहेत, त्यामध्ये देखील मोठी घट आली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.यामुळे बाजार तेजीत आहेत. धुळे जिल्ह्यातही परतीच्या पावसाचा मोठा फटका पिकांना बसला आहे. अतिवृष्टीमुळं मिरीचीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळं उत्पादन घटलं आहे. उत्पादनात घट झाल्यानं मिरचीच्या (Chili) दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे मिरचीचे दर गगनाला भिडले आहेत. रसगुल्ला मिरचीला किलोला 700 रुपयांचा दर मिळाला आहे.दोंडाईचा बाजार समितीत आंध्र प्रदेशातील गुंटूर येथून मिरचीची आवक होत आहे. अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचा फटका लाल मिरचीला बसला आहे. उत्पादनात घट झाल्यामुळं मिरचीची आवक घटली आहे. फापडा मिरचीला किलोला 340 रुपये भाव मिळत आहे. यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत.

  अतिवृषटीमुळं सोयाबीनसह कापूस, फळबागा, मिरची, पालेभाज्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली लाल मिरची खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिरचीला पावसाचं पाणी लागल्यानंतर मिरची काळी पडते. यामुळे ती जास्त दिवस ठेवता येत नाही, यामुळे ती विक्री करावी लागते. तसेच मिरचीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं मिरचीचे उत्पादन घटल्याचे सांगण्यात येत आहे. लाल मिरचीचे उत्पादन कमी झाले असताना दुसरीकडं मागणी वाढल्यानं लाल मिरची खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. याचा मात्र शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *