गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही नैसर्गिक शेतीचे मॉडेल आणणार. गुजरातच्या राज्यापालांनी नैसर्गिक शेतीचे एक मॉडल तयार केलं असून याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. त्यांनी कुठलंही रासायनिक पदार्थ न वापरता तिप्पट उत्पादन घेणं सुरू केलंय. त्यामुळे लवकरच नैसर्गिक शेतीचं मिशन हे आपल्याही राज्यात राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय हे सरकार शेतकऱ्यांच सरकार आहे. त्यामुळे नक्कीच शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील. असं आश्वासनही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले.

राज्यातील शेतकऱ्यांना 12 तास वीज देणारया सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना आता दिवसा १२ तास वीज उपलब्ध करून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. शेतकर्‍यांना दिवसा वीज मिळावी, यासाठी सौर कृषी वाहिनी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेकरिता लागणाऱ्या जागेसाठी शेतकर्‍यांना मोबदला सुद्धा देण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णयदेखील जारी करण्यात आला आहे. प्रतिहेक्टर प्रतिवर्ष 75,000 रुपये इतके हे भाडे असणार असल्याचं त्यात सांगण्यात आलं आहे.नवीन सरकार हे शेतकऱ्यांसाठी“राज्यातील नवीन सरकार हे शेतकर्‍यांच्या, कष्टकर्‍यांच्या, सामान्य नागरिकांच्या हितांचे रक्षण करणारे आहे. गेल्या अवघ्या 3 महिन्यांत सरकारने 7,000 कोटींची मदत शेतकर्‍यांना केली आहे. आता एनडीआरएफ निकषांपेक्षा दुप्पट आणि 3 हेक्टरपर्यंत मदत दिली जाणार आहे.


By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *