सध्या शेतकरी पावसामुळे मोठ्या संकटात सापडला आहे. यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत आहे. असे असताना आता अजून एक संकट शेतकऱ्यांवर आले आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील करंजाई परिसरात वीजतारांची चोरी आणि ट्रान्सफॉर्मर ऑईल चोरीच्या घटनांनी शेतकरी अडचणीत सापडला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आता लक्ष देण्याची गरज आहे.या परिसरातील दहा ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल आणि 20 ते 22 खांबावरील विजांच्या तारांची चोरी झाली आहे. परिणामी रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या तारा बाजारात महाग असून चोरांनी आता याला लक्ष केले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पिके धोक्यात आली आहेत. सध्या रब्बी हंगामावर शेतकऱ्यांनी केंद्रित केले आहे. असे असताना मात्र त्यांना नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. चोरट्यांनी शेतशिवारातील शेतीला वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल आणि विजेच्या खांबावरील तारा चोरुन नेल्या आहेत. त्यासोबत पाच महिन्यात दुसऱ्यांदा ट्रान्सफॉर्मरमधील ऑईलची चोरी झाली आहे.