गेल्या काही दिवसा पासून आपल्याला दुधाच्या किंमती मध्ये सातत्याने दर वाढ होत असल्याचे आपल्या ला दिसले आहे. परंतु ही दर वाढ करून सुद्धा पाहिजे त्या प्रमाणात दूध साठा उपलब्ध होत नाही त्यामुळे अमुल दूध संघा ने प्रति लिटर 2 रुपये ने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता फुल क्रीम दूध 61 रुपये प्रति लिटर वरून 63 रुपये इतके झाले आहे. हे नवीन दर 15 ऑक्टोबर पासून लागू झाले आहेत तसेच या अगोदर अमूल ने 15 ऑगस्ट रोजी दुधाच्या दरात वाढ केली होती.
कंपनीने ही घोषणा त्याच्या अधिकृत निवेदना मार्फत केली आहे. ही दर वाढ गुजरात वगळता बाकी सर्व राज्यामध्ये लागू होणार असल्याचे सांगितले आहे. परंतु कंपनीने या दर वाढी बदल अजून अद्याप कसल्याही प्रकारचे निवेदन जारी केले नाही आहे. या पूर्वी त्यांनी 15 ऑगस्ट ला दरवाढ केली होती आणि त्या अगोदर मार्च महिन्या मध्ये दर वाढ केली होती त्यामुळे या वर्षी मधील ही तिसरी दर वाढ आहे. त्यामुळे ऐण दिवाळीच्या सणाच्या मोहर्तावर अशी दर वाढ केल्यामुळे सर्वसामान्याना महागाई चा फटका बसणार आहे. यामुळे सर्वसामान्य च्या बजेट वर सुद्धा याचा परिणाम होईल असे बोलले जात आहे.